मित्रहो प्रेमकहाणी तर आपण खूप ठिकाणी पाहिली आहे, कधी चित्रपटात तर कधी खऱ्या आयुष्यात. बॉलीवूड मधील सिनेस्टार च्या प्रेमकथा आपण भरपूर ऐकल्या आहेत पण अशीही एक प्रेमकथा घडून गेली आहे जी ऐकून आपल्याला खूप आश्चर्य वाटेल. कदाचित ही प्रेमकथा सर्वांनी ऐकली असेल कारण देशभर प्रसिद्ध असणाऱ्या दाऊद इब्राहिम ची ही प्रेमकथा आहे. दाऊद ला तर कानाकोपऱ्यात ओळखले जाते, कारण अंडरवर्ल्ड च्या जगतातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्ती होता तो. अमाप पैसा आणि अफाट प्रसिद्धी ही त्याच्या पायाशी लोळण घालत होती.
अंडरवर्ल्ड सह बॉलीवूड देखील दाऊद च्या हातात असल्यासारखेच होते, त्याचा बॉलीवूड क्षेत्रावर चांगलाच दरारा होता. त्यामुळे सिनेस्टार आणि अंडरवर्ल्ड यांचे खूप जवळचे नाते आहे, हे आपण पूर्वीपासून पाहत आलेलो आहे. आतापर्यंत खूपशा कलाकारांच्या बाबतीत अंडरवर्ल्ड चे नाव त्यांच्या नावाशी जोडलेले आपण पाहिले आहे. मग त्यात संजय दत्त असो किंवा मग अभिनेत्री मोनिका बेदी हिचे अबू सलेम सोबत असलेले प्रेम. अशी भरपूर उदाहरणे आहेत जी बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड ला जोडली गेली आहेत.
डॉन दाऊद इब्राहिम हा अंडरवर्ल्ड मधील भरपूर प्रसिद्ध आणि खतरनाक माणूस होता, त्याच्या अमाप पैशावर जेव्हा पार्ट्या केल्या जायच्या तेव्हा त्या पार्टी मध्ये बॉलिवूड मधील अनेक तारे चमकताना दिसायचे, खूपसे अभिनेते, अभिनेत्री तिथे यायचे. त्यांची छायाचित्रे सुद्धा अनेकांच्या नजरेस पडली होती.त्यामुळे सगळीकडे खूप मोठी खळबळ माजली होती, खूप मोठा गदारोळ झाला होता. यात भर म्हणजे अनेक ताऱ्यांचे दाऊद सोबत केलेले संभाषण रेकॉर्डिंग सुद्धा लीक झाले होते. त्यामुळे सर्वांचा गोंधळ उडाला होता.
असे बोलले जाते की दाऊद हा खतरनाक तर होताच सोबतच तो शौकीन माणूस होता. पार्ट्या वगैरे तो करायचाच पण त्याच्या पार्टीत अनेक कलाकारांमध्ये अभिनेत्यासह अभिनेत्री सुद्धा असत, अनेक अभिनेत्री सोबत दाऊद चे नाव जोडले गेले होते. दाऊद कोणतीही अभिनेत्री आवडली की दाऊद तिला आपल्या जाळ्यात घेत होता, तीला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी तो काहीही करू शकत होता. कधी कधी तो मुंबईत असणाऱ्या आपल्या माणसांना पैशाचे आमिष दाखवून आपली इच्छा पूर्ण करत असे.

जोवर ती अभिनेत्री त्याच्या जाळ्यात अडकत नाही तोवर दाऊद शांत बसत नव्हता, पण काही वेळा स्वतःहून काहीजण दाऊद च्या सामोरी जात होते याचे कारण असे की दाऊद चा चित्रपट सृष्टी मध्ये खूप दरारा होता त्यामुळे कधी त्या कलाकारांना काम मिळत नसेल तर दाऊद च्या ओळखीने निर्माते त्यांना चित्रपट देत असत. यामुळे त्यांची कारकीर्द चांगली होऊन जातं असे.
दाऊद च्या जाळ्यात अडकणाऱ्या खुपशा अभिनेत्री होऊन गेल्या, पण डॉन दाऊद देखील एका सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात पूर्ण बुडाला होता. या अभिनेत्री ने आपल्या सौंदर्यासह अभिनयानेही रसिकांची मने जिंकली होती, त्या अभिनेत्री चे नाव मंदाकिनी नजीर असे होते. मंदाकिनी ने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ” राम ‘तेरी गँगा मैली हो गयी” या चित्रपटातून केली होती. या चित्रपटाने ती एका रात्रीत स्टार बनली होती कारण अशा प्रकारचे अंग प्रदर्शन या आधी क्वचितच झाली होते, त्यामुळे तिचा हा बोल्ड सीन भरपूर गाजला. यानंतर मग तीला भरपूर चित्रपट येत गेले आणि तीने कधीच मागे वळून पाहिले नाहीच.
मंदाकिनी ही एका ख्रिश्चन परिवरातून येते, तिच्या परिवाराचे आडनाव जोसेफ असे होते, तिच्या घरचे ख्रिश्चन धर्मावर खूप विश्वास ठेवत होते. मंदाकिनी ही अवघ्या वयाच्या 16 वर्षीच चित्रपट सृष्टीत आली आणि चांगलीच झळकली सुद्धा. तिचे नशीब इतके पालटले की एका झटक्यात तीला प्रसिद्धी मिळाली. तीचे अनेकजण चाहते झाले. तीचे कुंटुब मेरठ मध्ये वास्तव्याला होते आणि अजूनही ते तिथेच आहेत असे म्हटले जाते. राम ‘तेरी गंगा मैली …’ या चित्रपटानंतर तीला अनेक हिट चित्रपट येत गेले आणि ती सर्वत्र झळकू लागली याच वेळी तिच्या वर दाऊद ची नजर पडली आणि दाऊद तीच्या प्रेमात पूर्ण वेडा झाला. त्याने तीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात खेचले आणि मग मंदाकिनी ही दाऊद सोबत दुबईतच राहू लागली.
मंदाकिनी दाऊद ची पत्नी होती की प्रेयसी होती या बद्दल अजूनही सर्वांच्या मनात शंका आहे, या बद्दल स्पष्टपणे उल्लेख कुठेच झाला नाही. त्यामुळे याची पूर्ण माहिती स्वतः दाऊद आणि मंदाकिनी च देऊ शकतात. तर अशी होती ही इंटरेस्टिंग प्रेमकथा ,मित्रहो हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच लाईक आणि शेअर देखील करा.