January 16, 2022
CCTV

C.C.T.V कॅमेऱ्यात कैद झालेल्या ‘भुताचा’ चि’त्तथ’रारक कारणा’मा बघून सर्वांचे उ’डतील होश, हिम्म’त असेल तरच पहा पूर्ण व्हिडि’ओ…

मित्रहो काही घटना या अशा असतात ज्यावर आपला विश्वास बसने कठिण आहे पण त्या घटना सत्य असतात. मनाला भेदरून टाकणार्‍या असतात. अचानकच असे काही घडते ज्याची आपण काहीच कल्पना नाही करु शकत. डोळ्याची पापणी उघडून मिटेपर्यंत सगळं काही घडून जाते. पण तोच क्षण सी सी टिव्ही कॅमेऱ्यात कैद होतो. आणि मग आपल्या दृष्टीस पडतो.

सी सी टिव्ही कॅमेरा ही खूप उपयोगाची वस्तू आहे. यामुळे पोलिस बांधवांची खूप मदत होते, मोठमोठे गुन्हेगार असोत किंवा छोट्या छोट्या वस्तू चोरणारे चोर असोत. त्यांची हालचाल किंवा त्यांचे गुन्हे हे कॅमेर्‍यात कैद झाल्यामुळे त्यांना पकडणे पोलिसांना कठिण वाटत नाही. याचा उपयोग मोठ्यामोठ्या दुकानात सुद्धा होतो. दुकान मोठे असल्याने दुकानदारांना प्रत्येक माणसावर लक्ष ठेवणे कठीण असते.आणि मग अशा गर्दीच्या ठिकाणी लोकांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी सहज होते. पण कॅमेर्‍यात कैद झाल्यामुळे चोर लगेच सापडतो. चोरी करणे ही नियोजित घटना आहे, पण कॅमेर्‍यात अशा काही घटना कैद होतात ज्या अचानक घडतात.

मित्रहो आजचा लेख खूपच रहस्यमयी आहे, लेख पूर्ण वाचला तर तुम्हाला काही थरारक घटनांचा उलगडा होईल. विश्वास न बसण्यासारख्या या घटना आहेत. तुम्हाला व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटेल.घटना पहिली अशी आहे जी बघितल्यावर घाम फुटतो. अगदी अविश्वसनीय वाटते, एका रुम मधे दोन तरुण निद्रावस्थेत आहेत आणि त्याच वेळी रूमचा दरवाजा आपोआप उघडतो, कुणीतरी अदृश्य शक्ती आत मधे प्रवेश करते. त्यातील एक तरुण खॉटवर झोपलेला असतो आणि दुसरा खाली झोपलेला असतो.

जो तरुण खाली झोपलेला असतो त्याचे पाय आपोआप हवेमधे तरंगत वर येतात ,हळुहळू त्याचे शरीर वरील बाजूस खेचले जाते, आणि हलकेच झुलते, नंतर वेगाने खाली आदळते. तेव्हा त्याला जाग येते आजुबाजुला कोणीतरी असल्याचा त्याला भास होतो तो इकडेतिकडे बघत असतो पण कोणीच दिसत नाही. हा नजारा कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

घटना दुसरी अशी आहे एका रुममधे दोन बहिणी जेवत असतात, पण त्यातील एका मुलीला तिच्या बहिणीच्या पाठीमागे काही तरी विचित्र दिसते आणि मग ती घाबरुन तिथुन पळते, पण ती अशी पळून गेल्याने तिची बहिण तिच्यावर हसते, नंतर तिने काय पाहिले असावे हे जाणून घेण्यासाठी ती सुद्धा मागे वळते आणि थरथरायला लागते. तिलाही तिथे काही तरी भयानक दिसते आणि ते पाहून ती वेगाने धावते. त्या ठिकाणी खुपच काही तरी भितीदायक असणार.

तिसरी घटना खूप वेगळी आहे, हॉटेलच्या लॉबी मधुन एक व्यक्ती जात असतो, तो चालताना अचानक एक सावली येते आणि त्याला फरफटत नेत असते आणि थोड्या वेळाने पुन्हा त्याला सोडून गायब होते. तो खुपच घाबरतो आणि तिथुन पळतो. पण ही घटना काही क्षणातच घडते, आपणास काहीच कळुन येत नाही. त्या माणसाने देखील काहीच कल्पना केली नसावी. जेव्हा आपण व्हिडिओ पाहतो तेव्हा आपणास पण विश्वास बसत नाही पण हे सत्य आहे.

आता चौथी घटना तर पाहिल्यावर अंगावर शहारे येतात, घरात राहण्यास भिती वाटेल, एक व्यक्ती झोपलेला असतो, अचानक त्याला जाग येते आणि तो पाणी पिण्यासाठी उठतो तेव्हा त्याला खिडकीबाहेर कोणीतरी दिसते, पडदा हलतो पण ज्या वेळी तो पुढे जाऊन बघतो तेव्हा तिथे कोणीच नसते आणि विशेष म्हणजे खिडकी बंद असते. पडदा सुद्धा स्थिर असतो. ही घटना पाहिल्यावर आपणही घाबरुन जातो, विश्वासच बसत नाही. पण ही घटना सत्य आहे.

अशा चित्रविचित्र घटना घडतच असतात, ज्याच्या वर अजिबात विश्वास बसत नाही पण जेव्हा अनुभव येतो तेव्हा त्या घटना सत्य वाटतात. असे नेहमी काही तरी ऐकण्यास भेटते, पण याला रोखण्यासाठी आपण काहीच करु शकत नाही. हे माणसाच्या बुद्धीच्या पलिकडे आहे. आपण या पासून फक्त सावध होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *