May 17, 2022
Nik Saraf

अशोक सराफ यांचा मुलगा काय करतोय बघा. ऐकून तुम्हाला पण अभिमान वाटेल.

अशोक सराफ हे मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीचे सुपरस्टार आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना अतिशय जवळून ओळखतो. आज पण अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट पाहायला आवडतात. त्यांच्या पत्नी निवेदिता जोशी सराफ ह्या आजपण अभिनय क्षेत्रात काम करत आहे. अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी ने एके काळी मराठी सिनेमा खूप गाजवलेले आहे. त्यामुळे ते मराठी प्रेक्षकांच्या मनात अजूनही राज्य करत आहे.

अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ हा मात्र आई वडिलांच्या पाऊलावर पाऊल न टाकता त्याने वेगळे क्षेत्र निवडले. त्याने आपले करियर शेफ या क्षेत्रात बनवले. अनिकेत ने या क्षेत्रात त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आईचे स्वन्प पूर्ण करण्यासाठी तो ह्या क्षेत्रात उताराला आहे. अनिकेतने त्याचे शिक्षण फ्रान्स मध्ये पूर्ण केले आहे. आई ला किचन मध्ये स्वयंपाक करताना पाहून अनिकेत मध्ये आवड निर्माण झाली.

एक मुलाखतीत निवेदिता सराफ बोलल्या होत्या कि, अनिकेत ने अभिनयाकडे न वळता शेफ बनवावे आणि त्याने आईचे स्वप्न पूर्ण केले. अशोक सराफ पण अनिकेत ने निवडलेल्या क्षेत्रा बद्दल खूप खुश आहेत. अनिकेत एक उत्कृष्ट शेफ आहे. तो पाश्चिमात्त्य पद्धतीचे जेवण खूप छान बनवतो. Youtube वर अनिकेत चा “Get Curried” नावाचा चॅनल आहे. त्याचे जवळपास १९ लाख पेक्षा जास्त सबस्क्रिबर आहेत. रोज नवं नवीन डिश बनवून त्याचे व्हिडिओस चॅनल वर येत असतात. सोशिल मीडियावर हि अनिकेत खूप अक्टिव्ह आहे. रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो. चला तर मग त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन. तुम्हाला काही माहिती समाविष्ट करायची असेल तर जरूर कंमेंट करू. आम्ही माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू.

Leave a Reply

Your email address will not be published.