आजकाल च्या युगात आयुर्वेदाला खूप महत्व आले आहे. कोणतेही जुना आजार आयुर्वेदाने कायमचा बरा होतो. आयुर्वेदाचे उपचार बराच काळ चालतो. पण आजार कायमचा नष्ट होतो. कडुनिंब हे आयुर्वेदात अत्यंत महत्वाचे आहे. ह्या झाडात सर्वच भागात काही ना काही गुणधर्म आहे त्यामुळे खूप आजारावर याचा फायदा होतोत. कडुनिंबाचे पाने आणि फुले खूप महत्वाचे औषध मानले जातात. खाली काही कडुनिंबाचे फायदे दिले आहे.
१. कडुनिंबाचे सर्वात महत्वाचे फायदा म्हणजे रक्त शुद्धी कारणासाठी होतो.यासाठी तुम्ही पाने खाऊ शकतात किंवा निमा गोळी खाऊ शकता त्यामुळे तुम्हाला रक्ता च्या संबधी आजारावर आराम मिळू शकतो.
२. सकाळी कडुनिंबाच्या फांदी ने दात घासल्यास तुम्हाला दात आणि हिरड्याच्या आजारापासून सुटका होऊ शकते.
३. कडुनिंबाचा पाने खाऊन तुम्ही शरीरातील मधुमेह आणि साखर नियंत्रणात आणू शकता.
४. त्वचारोगावर कडुनिंब रामबाण उपाय आहे. कडुनिंबाचे रोज सेवन केल्याने चेहऱ्यावरचा तेलकट पणा सुद्धा कमी होतो.
५. कडुनिंबामुळे हिवताप, मूळव्याध, कुष्ठरोग लवकर बरे होऊ शकतात.
६. डोळ्यांचे आजार आणि कान दुखणे यावर सुद्धा कडुनिंबाचा खूप फायदा होतो.
७. केसांचे गळणे, केसांतील कोंडा, उवा यासाठी सुध्दा कडुनिंब फायदेशीर आहे. कडुनिंबाची पाने उकळून ते पाणी केस धुवायला वापरावे.
८. कडुनिंब कॅन्सर आणि हृदयरोगासाठी रामबाण उपाय आहे.
९. मलेरिया झाले असेल तर डॉक्टर कडुनिंबाचे पाने खाण्याचा सल्ला देतात.
१०. कडुनिंबाचे पाने खाल्लेने पोटातील अल्सर, बद्धकोष्ठ आणि पोटातील मुरड कमी होऊ शकते.
११. साप चावल्यास कडुनिबांचा पाने खल्लास फायदा होतो.
१२. कडुनिबांचा चहा पिल्याने पोटातील जंत नाहीसे होतात.
१३. कडुनिंबाच्या बियांचे तेल जखमा भरण्यास उपयुक्त असते.
१४. बायकांच्या गर्भशयावरील आजारावर कडुनिंब फायदेशीर आहे.
१५. लघवीच्या आजारावर सुद्धा कडुनिंब उपयुक्त आहे.
वरील माहिती तुम्हाला काही नवीन माहिती समाविष्ट करायची असेल तर जरूर कंमेंट करा. आम्ही तुमची माहिती समाविष्ट करायचा प्रयत्न करू.