महाराष्ट्र कारले चे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. कारले चवीसाठी कडवट असते. कारले शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. कारल्याचा वेगवेगळ्या गुणधर्मामुळे त्याला भाजीपाल्यात महत्वाचे स्थान आहे. कारले खायला जरी कडवट असेल तरी आयुर्वेदात त्याचे खूप सारे फायदे आहे. एक औषधी भाजी म्हणून ओळखले जाते. कारल्यात लोह आणि अ व क जीवनसत्व मोठया प्रमाणात आढळते, तसेच त्यात अधिक प्रमाणात प्रोटीन, कार्बोहैड्रेट, चुना,पोटॅशिअम, फॉस्फरस हि खनिजे असतात. कारले खाण्याची फायदे खाली दिलेले आहे.
१. कारले शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे काम करते. रक्तातील दोष दूर करण्यासाठी कारल्याचा जूस पितात.
२. कारले त्वचा रोगासाठी अतिशय उपयुक्त आहे. एक्सिमा आणि सोरायसिस सारखे मोठे आजार बरे होण्यास मदत होते.
३. मधुमेह आणि दम्यावर कारले खूप गुणकारी औषध आहे. रोज कारल्याचा जूस पिल्याने हे आजार नियंत्रीत येतात.
४. कारले जंत आणि पोटांचे विविध आजारावर उपयोगी आहे. कारले पचनास खूप हलके असतात. त्याच्या सेवनाने भूक लागते, मल व्हायला त्रास नाही होत.
५. कारले हे कडू, अग्निदीपक, गरम, अत्यंत परिणामकारक, शीतवीर्य आणि फायदेशीर आहे त्यामुळे ते कफ, वायू, रक्तदोष, ताप, पित्त व कोडे नाहीशे करते.
६. कारले मूळव्याध वर अत्यंत फायदेशीर औषध आहे. कारल्याने आतड्यामध्ये असलेल्या जंतूंचा नाश करतात. कारल्याचा जूस मूळव्याधीवर खूप फायदेशीर आहे.
७. कारल्याचा जूस संधीवात आणि कावीळ खूप उपयुक्त आहे.
वरील माहितीत अजून काही माहिती समाविष्ट करायची असेल तर जरूर कंमेंट करा.