आजकाल कोरोनामुळे आजाराची खूपच चिंता वाढत आहे. घसा हा मानवी शरीराचा अत्यंत नाजूक भाग आहे त्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.खाली काही उपयुक्त घरगुती उपाय तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो.
१. घशा ला सूज आली असेल तर भाजलेली लवंग तोंडात ठेवावी. त्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो.
२. जर घसा खवखव किंवा दुखत असेल तर मध पाण्यात मिसळून गुळण्या कराव्या त्यामुळे तुम्हाला बरं वाटू लागेल.
३. कोमट पाण्यात मीठ मिसळून तुम्ही दिवसातून ३ वेळा गुळण्या केल्या तर तुमच्या घशाला आराम मिळू शकतो.
४. चिंच पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने घशाला आराम पडतो.
५. आवाज मोकळा होण्यासाठी पिकलेले डाळींब खावे.
६. मेंदीच्या पानांचा काढा पिल्याने घशाला चांगला आराम मिळतो.
७. गरम पाण्यात तुळशीच्या पाने टाकून पाणी प्यावे किंवा गुळण्या कराव्या.
८.पळसाचे पाने पण गरम पाण्यात टाकून गुळण्या कराव्या त्यामुळे घशाला आराम पडतो.
९. मेथ्यांचा काढा सुद्धा घशासाठी गुणकारी आहे. दोन चमचा मेथ्या एक लिटर पाण्यामध्ये कमी जाळावर अर्धा तास उकळाव्या नंतर त्यालाच थंड करून गुळण्या कराव्यात. असे केल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो.