May 17, 2022
Rice Farming

भाताच्या पिकाचे रोपे तयार करताना घ्यावयाची काळजी

भातावर बहुसंख्य लोकांचे जीवन अवलंबून आहे. हे पीक प्रामुख्याने दक्षिण भारतात घेतले जाते. महाराष्ट्रात हे पीक कोकणात प्रामुख्याने घेतले जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी भात मुख्य पीक म्हणून ओळख आहे. तर आपण पाहूया ह्या विषयाच्या काही महत्वाच्या सूचना त्यामुळे तुम्हाला उत्पादनात भर पडू शकते.

जमीन – हा खूप महत्वाचा भाग आहे. भातासाठी कमीत कमी ३-६ महिने पाणी असलेली जमीन निवडावी. बीज उत्पादनासाठी पोयटा जमीन अत्यंत प्रभावी ठरते.

शुद्ध बीज उत्पादनासाठी हि जमीन ३ मीटर हुन अधीक अंतरावर असावे.

लागवड – भाताची बीज उत्पादन करण्यासाठी चिखल करणे गरजेचे आहे. खाली दिलेले महत्वाचे मुद्दे वाचा.

१. रोपासाठी अशी जमीन निवडावी जिथे मागील हंगामात भात लागवड केली नसावी.

२. पेरणी कालावधी दोन प्रकारात असतो. उशिरा येणारे वाणांचा कालावधी २५ मे ते १० जून असतो आणि लवकर येणारी वाणांचा कालावधी १० ते २५ जून असतो.

३. रोपे रुजण्यासाठी जमिनीची योग्य रीतीने नांगरणी आणि कोळपणी करून सपाट करून घ्यावी. त्यांनतर त्या वाफ्यास पाणी देऊन चिखलणी करावी आणि दोन दिवस वाफा तसाच ठेवावा.

४. साधारणतः ९ चौ. मी. जमिनीसाठी ४५० ग्राम सुपर फॉस्पेट जमिनीत मिसळावे.

५. पेरणीपूर्वी बियाणे १६ ते २० तास पाण्यात भिजवून ठेवावे आणि नंतर ते पोत्यात झाकून ठेवावे आणि त्यानंतर बियाणे वाफेत फोकून द्यावे.

६. पेरणीनंतर जवळपास ३ ते ४ आठवड्यात रोपे लागवडीसाठी येतात.  

जर तुम्हाला वरील माहितीत अजून काही सामाविस्ट करायचे असेल तर कंमेंट जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.